Aai Aahe Swarg Baba Darwaja Lyrics In Marathi And English

aai-aahe-swarg-baba-darwaja-lyrics-in-marathi-and-english

Aai Aahe Swarg Baba Darwaja Lyrics In Marathi

आईचे मोल कसे लावाल
बाबाचे त्याग कसे मोजाल
आईचे मोल कसे लावाल
बाबाचे त्याग कसे मोजाल
कसा लावाल तुम्ही अंदाजा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

आईचे मोल कसे लावाल
बाबाचे त्याग कसे मोजाल
आईचे मोल कसे लावाल
बाबाचे त्याग कसे मोजाल
कसा लावाल तुम्ही अंदाजा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

आईने देह तुझा घडविला
बाबाच्या कष्टाने तो वाढविला
आईने केले तुला संस्कार
बाबाने पेलला तुझा भार

आईने घास तुला भरवीला
बाबाने देह त्याचा झिजविला
सावली आईचा पदर झाला
घामात भिजूनी बाबा तो न्हाला

आई झिजली तुला चंदन केला
तुझ्या साठी बाबा घोडा झाला
आई ती जागली किती रात
बाबाने जोडले किती हात

पांग फेडशील कसे दोघांचे
मोल लावशील कसे प्रेमाचे
पांग फेडशील कसे दोघांचे
मोल लावशील कसे प्रेमाचे
कोणी मिळेल का दुजा पाह जा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

आई बाबाने स्वप्ने सारून
तुला नेले जगात तारून
त्यांच्या कष्टाने तू उभा झाला
उपकार विसरुनी दगा केला

तुझ्या हसण्यात गेले भारून
तू निघालास त्यांना सारून
दोघ रडले पदर ते पसरून
बोलले जाऊ नको विसरून

दोघे करतात तुझी मनधरणी
कुठे फेडशील तुझी ही करणी
दोघे जड झाले तुला आई बाबा
आता शब्दांचा सोडतो ताबा

तुझा उत्कर्ष दोघांनी केला
सारी माया तू विसरुनी गेला
तुझा उत्कर्ष दोघांनी केला
सारी माया तू विसरुनी गेला
त्यांचा आदर्श तू जरा घे जा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

तुझ्या मागे पळाली ती आई
विसरला का तिची ती अंगाई
आठवते का ती गोष्ट बाबांची
आटपाट गावाची त्या राजाची

तुझ्या सोबत ते दोघे शिंकायचे
तुझ्या जिंकण्यात दोघे जिंकायचे
आठव बाबा खेळात हारायचा
माकड होऊन उड्या तो मारायचा

आई पदरात घेऊन झोपायची
काळजी पाई तुला टोकायची
आईचे दूध नको विसरू तू
बाबाचा घाम नको विसरू तू

तुझे पुरविले हट्ट ते सगळे
तुझ्यासाठीच दोघे रे जगले
तुझे पुरविले हट्ट ते सगळे
तुझ्यासाठीच दोघे रे जगले
त्यांचे गुणगान तू सदा गा जा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

ठेच लागेल तुला तू पडशील
वेळ गेल्यावरी तू रडशील
वेळ जाण्याआधी घे सावरून
चुका साऱ्या तुझ्या घे आवरून

आई बाबाच्या पाई लागून
कर तौबा घे माफी मागून
त्यांची सर ना कुणा रे येणार
त्यांची जागा कुणी ना घेणार

सुख सारे मिळेल दोघां अवति
देव पण फिरला दोघांच्या भवति
जीवाचा त्याग दोघे करतील
जड नको तुला म्हणून मरतील

सोड रे सोड माया ही सारी
हेच तुझे देव तुझी पंढरी
सोड रे सोड माया ही सारी
हेच तुझे देव तुझी पंढरी
त्यांच्या पाई सुखाने जा रहा जा

आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा

You may also like...